Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: …तर इतिहास धस यांना क्षमा करणार नाही; धस-मुंडेंच्या भेटीवरून राऊत...

Sanjay Raut: …तर इतिहास धस यांना क्षमा करणार नाही; धस-मुंडेंच्या भेटीवरून राऊत कडाडले

मुंबई । Mumbai

संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आरोपांची राळ उठवून मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले होते. मात्र, धस मुंडे यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी गुप्तभेट झाल्याची माहिती बाहेर येताच राजकीय कल्लोळ निर्माण झाला. यावरून आता संजय राऊतांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. ते शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

धस-मुंडे भेटीबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, बीडमधल्या एका प्रमुख नेत्याने मला सांगितले होते की सुरेश धस यांच्यावर विश्वास ठेऊ नका. सुरेश धस देशमुख कुटुंबाला न्याय देतील, ते या लढ्याचे नेतृत्व करत आहेत असे आम्ही म्हणत होतो तेव्हा लोकांनी समजावले होते की त्यांची बाजू घेऊ नका. ते कधीही पलटी मारतील. धस, मुंडे आणि कराड एकच आहे. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. दुर्दैवाने हे सत्य होताना दिसत आहे.

मला वाईट वाटते की, एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबीयांच्या अश्रुंचा बाजार मांडला आणि व्यापार केला. हा माणूस आम्हाला न्याय देईल, असे म्हणत संतोष देशमुख यांची लहान मुलं धस यांच्या मागे न्यायासाठी धावत होती. जर धस यांनी हे कृत्य केले असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही, इतिहास क्षमा करणार नाही. असा खोटारडेपणा केला असेल आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर बीडचीच नाही तर राज्याची जनताही हे लक्षात ठेवेल. तुम्ही जे कृत्य केले ते पाप असून या पापाला क्षमा नाही. हे विश्वासघाताच्याही पुढचे पाऊल आहे, असे राऊत म्हणाले.

धस यांच्याकडून न्यायाची अपेक्षा ठेऊ नका असे मला वारंवार बीडचे काही लोक सांगत होते. त्यांचे म्हणणे असे होते की वाल्मीक कराड, सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे एकच आहेत. एका नाण्याला दोन बाजू असतात, पण या तीन बाजू आहेत. पण मी विश्वास ठेवला नाही, असेही राऊत म्हणाले.

सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे मान्य केले आहे. तसेच आपण डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटल्याचे म्हणाले आहेत. मी स्वत: दिवसा त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार, फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो, तर त्यात गजहब करण्यासारखं काय आहे?, असे सुरेश धस यावेळी बोलताना म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...