Tuesday, December 3, 2024
Homeनाशिकदुर्दैवी : सुरगाण्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

दुर्दैवी : सुरगाण्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

- Advertisement -

उंबरठाण परिसरात दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. बेहूडणे येथील शेतकरी मुरलीधर वसंत चौधरी वय ४१ हे आपली गुरे चारण्यासाठी घेऊन गेले होते.जोरदार पाऊस व वीजा चमकत असतांना त्यांने लपण्यासाठी झाडाचा आधार घेतला असता साडेचार वाजता अचानक अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेल्या एक वर्षीय श्वानाचाही मृत्यू झाला.

काही वेळाने सोबत असलेले शेतकरी यांनी जागेवर जाऊन पाहिले असता त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. पोलीस पाटील वामन पालवा, तलाठी वाघमारे यांनी तात्काळ तहसिलदार रामजी राठोड यांना कळविले. भाऊ प्रभाकर चौधरी यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली.

शवविच्छेदनासाठी मृतदेह सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृत्यदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आहे.अधिक तपास पोलीस दिलीप वाघ हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या