येवला | प्रतिनिधी Yeola
नायलॉन मांजा वापरणाऱ्या पतंगप्रेमींवर आता ड्रोन कॅमेराने नजर ठेवली जाणार असून पालकांवर देखील कारवाई करण्याचा इशारा प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिला आहे.
नायलॉन मांजा विक्री आणि वापर करणाऱ्या पतंग प्रेमींवर प्रशासन आता ठोस कारवाई करणार आहे. ६ जानेवारी रोजी शहरातून महसूल, पोलीस, पालिका प्रशासन यांच्या वतीने नॉयलॉन मांजाच्या वापर आणि विक्री विरोधात रॅली काढण्यात येणार असून या रॅलीत समाजसेवी नागरिक, संघटना, विद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक सहभागी होणार आहेत.
प्रशासनाच्या वतीने दररोज तीन ड्रोन कॅमेराने ६ जानेवारी पासून नजर ठेवली जाणार असून ज्यांनी नायलॉन मांजा खरेदी केला आहे, त्यांनी स्वेच्छेने नायलॉन मांजा घरातून बाहेर काढून द्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले असून या मांजाची रॅलीनंतर होळी करण्यात येणार असल्याची माहितीही प्रांताधिकारी गाढवे यांनी दिली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा