Friday, November 22, 2024
Homeनाशिकमुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जळगावात शिक्षकांना पैसे वाटप; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जळगावात शिक्षकांना पैसे वाटप; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे खळबळ

मुंबई | Mumbai

राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यात नाशिक शिक्षक मतदारसंघाचा (Nashik Teachers Constituency) देखील समावेश असून याठिकाणी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) महायुतीचे किशोर दराडे आणि महाविकास आघाडीचे संदीप गुळवे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Politics : भाजप विधानसभेच्या तब्बल १७० जागा लढवणार?

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महायुतीमधील शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये बैठका घेतल्या.पंरतु, यामधील जळगाव येथील आदित्य लॉन्स येथे झालेल्या सभेनंतर शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्स (ट्विटर) या सोशल मिडिया माध्यमावर पोस्ट करत केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की,”महायुतीचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. या सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले. कुठे आहे निवडणूक आयोग?, असे म्हणत आरोप केला आहे. तसेच याबाबतचे आणखी व्हिडिओ असून आपण याची रीतसर निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार करणार असल्याचे अंधारे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची हजेरी; नागरिकांची तारांबळ

दरम्यान, दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shinde Shivsena) ‘असे काही घडले नाही, सभेला उपस्थित असणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी हे व्हिडिओ काढले आहेत’, असे म्हणत अंधारे यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर अंधारे यांच्या या आरोपांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून शिंदेंच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चांगलेच वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या