Thursday, March 13, 2025
HomeनगरBJP : पाचपुते, मुरकुटे भाजपमधून निलंबीत

BJP : पाचपुते, मुरकुटे भाजपमधून निलंबीत

अहिल्यानगर / श्रीगोंदा । प्रतिनिधी

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर महायुतीमध्ये बंडखोरी रोखण्यात पक्ष नेतृत्व यशस्वी झाले नाही. नगरसह राज्यात अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे.

- Advertisement -

विशेष करून भाजपमध्ये त्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे भाजपने 40 जणांवर निलंबनाची छडी उगारली आहे. यात जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश पक्षाचे प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिले असून श्रीगोंदा तालुक्यातील सुवर्णा पाचपुते आणि नेवासाचे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मरकुटे याचे निलंबन पक्षाने केल आहे.

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात निवडणूक लढण्यावरून नाराजी नाट्य पार पडले. यात तिकीट मिळाले नसल्याने अनेक उमेदवार बंडखोरी करत रिंगणात उतरले. यात श्रीगोंदा मतदारसंघात देखील भाजप महायुतीने अगोदर प्रतिभा पाचपुते यांना तिकीट घोषित केले. त्यानंतर प्रतिभा पाचपुते यांनी उमेदवारी मागे घेतल्याने विक्रम पाचपुते महायुतीचे उमेदवार आहेत.

पण भाजपच तिकीट मिळवण्यासाठी तालुक्यातील सुवर्णा पाचपुते प्रयत्नशील होत्या. त्यांना तिकीट मिळले नाही. तिकीट मिळले नाही. यानंतरनंतर देखील त्यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेत उमेदवारी ठेवली आहे. भाजपने राज्यातील बंडखोरी केलेली आणि पक्षाचे आदेश मान्य नसल्याने अश्यना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

यात जिल्ह्यातील माजी आ. बाळासाहेब मुरकुटे आणि श्रीगोंदा येथील सुवर्णा पाचपुते याचा समावेश आहे. यात भाजपचे पदाधिकारी असून पक्ष शिस्त व अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे. यामुळे आपली ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असून आपल्याला तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत असल्याचे निलंबन पत्राच्या यादीत म्हटले आहे.

पुढील भूमिकेकडे लक्ष

भाजपच्यावतीने श्रीगोंद्यातील सुवर्णा पाचपुते आणि नेवाशातील माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर ते आता काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. येणार्‍या निवडणुकीत पाचपुते आणि मुरकुटे यांच्या बंडखोरीचा काय परिणाम निकालावर होणार हे मतमोजणीनंतर समोर येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...