येवला | प्रतिनिधी
तालुक्यातील चिचोंडी येथील तलाठी राहुल रिंढे यांना १ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयातच रंगेहात पकडले.
- Advertisement -
मिळालेल्या माहितीनुसार, सातबारा उताऱ्यावरील नोंदीसंदर्भात संबंधित तलाठ्याने तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर १ हजार ५०० रुपये स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक भारतकुमार तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.




