- Advertisement -
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
आज चांदवड परिसरात परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. चांदवड तालुक्यात तुफान पाउस झाल्याने तामटीचा बंधारा फुटल्याचे समजते. दरम्यान प्रशासनाकडून मदत कार्य सुरु असून काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविल्याचे वृत्त आहे.
त्याच प्रमाणे उमराणे परिसरात परसुल नदी परिसरात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवर जास्त प्रमाणत पाणी साचल्याने दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे समजते. पूर सदृश्य स्थितीमुळे उमराणे ग्रामपंचायत, ग्रामपंचायत अधिकारी यांचे कडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे कळते.
नामपूर परिसरातही परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान या पावसाच्या तडाख्याने कांदा पिकाचे त्याच बरोबर द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.