Sunday, June 14, 2026
HomeनाशिकNida Khan: टीसीएस धर्मांतर लैंगिक अत्याचार प्रकरण; निदा खानला ११ मे पर्यंत...

Nida Khan: टीसीएस धर्मांतर लैंगिक अत्याचार प्रकरण; निदा खानला ११ मे पर्यंत पोलिस कोठडी

नाशिक रोड | प्रतिनिधी
नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस धर्मांतर, लैंगिक शोषण आणि मानसिक छळ प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला २७ दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी राबवलेल्या एका अत्यंत गुप्त आणि वेगवान मोहिमेत निदा खानला छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या. तिने अटकपूर्व जामिनासाठी आधीच हालचाली करत अर्ज देखील केला होता. मात्र, कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला होता.

सुनावणी वेळी काय झाले?
गुरुवारी निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केल्यानंतर आज शुक्रवारी तिची वैद्यकिय चाचणी करण्यात आली, त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयात सुरक्षेच्या कारणास्तव निदा खान हिची इन कॅमेरा सुनावणी पार पडली. यावेळी नाशिक रोड न्यायालयात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुनावणी दरम्यान न्यायालयात सरकारी वकील, निदा खानचे वकील, तपासी यंत्रणा उपस्थित होते. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. तर निदा खान हिचे वकील राहुल कासलीवाल यांनी निदा खान हिची बाजू मांडली. तपासी यंत्रणांनी निदा खान हिने कशा पद्धतीने गुन्ह्यात मदत केली याची न्यायालयात माहिती दिली. यावेळी निदा खान हिने कार्यालयातील पीडितांवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान या युक्तिवादानंतर निदा खान हिला ११ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

- Advertisement -

Imtiaz Jaleel: …तर मी उघडपणे सांगतो, पूर्ण ताकदीने; निदा खान अटकेवरुन इम्तियाज जलीलांची प्रतिक्रिया

निदा खानला अटक
निदा खान गेल्या काही दिवसांपासून कॅसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये राहत होती. विशेष म्हणजे तिच्यासोबत तिचे ४ नातेवाईकही फ्लॅटमध्ये सोबत राहायचे. पोलिसांना तिच्या लोकेशन बदलाची माहिती वेळोवेळी मिळायची परंतु प्रत्येक वेळी तपास यंत्रणेच्या तावडीतून वाचण्यात तिला यश येत होते. अखेर नाशिक क्राइम ब्रांच आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तिला ताब्यात घेण्यात आले. रात्री ११.३० वाजता पोलिसांच्या टीमने तिला अटक केली.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...