Saturday, May 2, 2026
HomeनगरAhilyanagar : यंदा गुरूजींना 128 दिवस सुट्ट्या!

Ahilyanagar : यंदा गुरूजींना 128 दिवस सुट्ट्या!

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून वेळापत्रक जाहीर || 237 दिवस भरणार शाळा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्य सरकारच्या प्राथमिक शाळांच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या ठिकाणी कार्यरत असणार्‍या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून शैक्षणिक वर्षेनिहाय प्राथमिक शाळांच्या कामकाजाचे दिवस, सुट्ट्या निश्चित करण्यात येतात. या सुट्ट्यामध्ये सार्वजनिक सुट्ट्या, रविवार, दिर्घकालीन सुट्ट्या, दिवाळीतील सुट्ट्या, उन्हाळी सुट्ट्या यांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यातील शाळांच्या सुट्ट्यांचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी अंतिम केले आहे. यात जिल्ह्यात 237 दिवस शाळा सुरू राहणार असून प्राथमिक शिक्षकांना 128 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सुट्ट्या बाबतचे नियोजन केले आहे.

- Advertisement -

यात 2025-26 या आर्थिक वर्षातील शाळांचे कामकाजाचे दिवस, वार्षिक सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत. यात जून महिन्यांत 12 दिवस दिर्घ सुट्ट्या, 5 रविवार आणि कामकाजाचे 13 दिवस होते. जुलै महिन्यांत 1 सार्वजनिक सुट्टी, 4 रविवार, 26 दिवस कामाचे होते. ऑगस्ट महिन्यांत 6 सार्वजनिक सुट्ट्या, 5 रविवार, 20 कामाचे दिवस, सप्टेंबर महिन्यांत 4 सार्वजनिक सुट्ट्या, 4 रविवार आणि 22 कामाचे दिवस, ऑक्टोबर महिन्यांत 4 सर्वाजनिक सुट्ट्या, 7 दिर्घकालीन सुट्ट्या, 4 रविवार आणि 16 दिवस कामाचे, नोव्हेंबर महिन्यांत 1 सार्वजनिक सुट्टी, 5 रविवार आणि 24 कामाचे दिवस, डिसेंबर महिन्यांत 2 सार्वजनिक सुट्ट्या, 4 रविवार आणि 25 दिवस कामाचे राहणार आहेत.

जानेवारी 2026 मध्ये 2 सार्वजनिक सुट्ट्या, 4 रविवार आणि 25 कामाचे दिवस राहणार असून फेबु्रवारी महिन्यांत 1 सार्वजनिक सुट्टी, 4 रविवार आणि कामाचे 23 दिवस, मार्च महिन्यांत 6 सार्वजनिक सुट्ट्या, 5 रविवार आणि 20 कामाचे दिवस राहणार आहेत. एप्रिल महिन्यांत 2 सार्वजनिक सुट्ट्या 4 रविवार आणि 24 दिवस कामाचे दिवस राहणार आहेत. तसेच मे महिन्यांत 2 सार्वजनिक सुट्ट्या, 25 दिवस दिर्घकालीन सुट्ट्या, 4 रविवार असे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार जिल्ह्यात शिक्षकांना 76 दिवस सार्वजनिक व प्रासंगिक 25 दिर्घकालीन, 52 रविवारच्या सुट्या अशा एकूण 128 दिवस सुट्ट्या मिळणार असून कामकजाचे 237 दिवस राहणार आहेत.

अशा आहेत सुट्ट्याचे प्रकार
52 रविवार, 19 सार्वजनिक सुट्ट्या, 2 स्थानिक सुट्या, 10 प्रासंगिक सुट्ट्या, 7 दिवाळीच्या सुट्ट्या, 37 उन्हाळी सुट्या व 1 राखीव सुट्ट्या या सुट्ट्यांचा समावेश आहे.

उन्हाळ्यात 16 मार्चपासून सकाळची शाळा
उन्हाळ्यात विद्यार्थ्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठीचे नियोजन आतापासून करण्यात आले आहे. या नियोजनात पुढील वर्षी मार्च 2026 मध्ये 16 तारखेपासून सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत शाळा भरणार आहेत. सकाळच्या सत्रातील ही शाळा 30 एप्रिलपर्यंत भरवण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

रमाजनमध्ये उर्दुशाळा भरणार सकाळी
जिल्ह्यात रमजान महिन्यांत जिल्ह्यातील उर्दुशाळा या सकाळाच्या टप्प्या भरवण्यात येणार आहे. ही सवलत केवळ उर्दुशाळांना देण्यात आली आहे. सुट्ट्यांचे नियोजन करून प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकारी यांनी शाळांच्या तासिका पूर्ण होतील, यासानुसार नियोजन करण्याच्या सुचना शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

Shirdi : पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी घेतले साई दर्शन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून मुम्मका सुदर्शन (SP Mummaka Sudarshan) यांनी शनिवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी शिर्डी...