Thursday, October 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde News: एकनाथ शिंदेंच्या यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; टेक ऑफ घेतानाच...

Eknath Shinde News: एकनाथ शिंदेंच्या यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; टेक ऑफ घेतानाच घडला प्रकार

अहमदाबाद | Ahemdabad
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुजरात दौऱ्यात त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. वडनगरहून अहमदाबादकडे जाण्यापूर्वी हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक समस्या आढळून आली. पायलटच्या लक्षात हा प्रकार येताच हेलिकॉप्टरचे उड्डाण थांबवण्यात आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरने प्रवास न करता रस्ते मार्गाने अहमदाबादकडे प्रस्थान केले.

वडनगरहून अहमदाबादला जाणार होते
एकनाथ शिंदे हे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी वडनगरहून अहमदाबादला हेलिकॉप्टरने जाण्याचे नियोजन होते. मात्र, उड्डाणाच्या तयारीदरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे पायलटच्या निदर्शनास आले. बिघाड लक्षात येताच सुरक्षेच्या दृष्टीने हेलिकॉप्टरचे टेक ऑफ थांबवण्यात आले. त्यामुळे नियोजित हवाई प्रवास रद्द करण्यात आला.

- Advertisement -

Uddhav Thackeray: गरीब शेतकऱ्याचा पोरगा हेलिकॉप्टरने शेतात जातो, लंडनला जाऊन पुरस्कार विकत घेतो; उध्दव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

शिंदे रस्ते मार्गाने अहमदाबादला रवाना
हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी रस्ते मार्गाने अहमदाबादला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा नियोजित कार्यक्रम कायम ठेवण्यात आला असून, हेलिकॉप्टरच्या बिघाडामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.

मोठा अनर्थ टळला
हेलिकॉप्टरने प्रत्यक्ष उड्डाण करण्यापूर्वीच तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने संभाव्य धोका टळला. पायलटने वेळीच समस्या ओळखून उड्डाण न करण्याचा निर्णय घेतल्याने शिंदे यांचा हवाई प्रवास थांबवण्यात आला. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला, त्याचे कारण काय होते आणि हेलिकॉप्टरची तांत्रिक तपासणी कशी करण्यात आली, याबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : बिनविरोध निवडणुकीच्या बैठका निष्फळ

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar दुष्काळी परिस्थितीचे कारण देत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा जिल्ह्यातील नेत्यांनी घातलेला घाट केवळ बैठकांपुरताच मर्यादित ठरला. प्रत्यक्षात त्याची फलनिष्पत्ती...