Friday, June 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजवीज कोसळून दहा मेंढ्या ठार; मेंढपाळ जखमी

वीज कोसळून दहा मेंढ्या ठार; मेंढपाळ जखमी

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

दोन दिवस विश्रांती घेऊन परतीच्या पावसाने आज पुन्हा मुसळधार हजेरी लावत शहरासह तालुक्यास अक्षरश: झोडपून काढले. साडेपाच वाजेनंतर विजांचा कडकडाट व वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने शहरात जनजीवन विस्कळीत झाले होते. तर तालुक्यात उर्वरित खरीप पिकांचीदेखील अतोनात हानी केली. तालुयातील मळगाव शिवारात मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळून दहा मेंढ्या जागीच ठार झाल्या तर एक मेंढपाळ गंभीर जखमी झाला.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शहरासह तालुयात दोन दिवस असलेल्या ढगाळ वातावरणाची परिणती आज सायंकाळी धुव्वाधार पावसात झाली. तत्पूर्वी दुपारपर्यंत प्रखर उन्हाचा तडाखा जाणवत होता. मात्र सायंकाळी साडेपाचनंतर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. सुमारे दीड ते दोन तास सुरू असलेल्या या पावसाने शहरातील जवळपास सर्वच रस्ते जलमय झाले होते. भुयारी गटारीचे काम सुरू असल्याने पावसात रस्त्यावरील खड्ड्यांतून वाट काढताना नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शिवतीर्थ, नवीन बसस्थानक, मोसम पूल या भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते.

दरम्यान, अतिवृष्टीने तालुयातील विविध गावांत हजारो हेटरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले असताना व या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू असतानाच पुन्हा पावसाने कहर करत उर्वरित खरीप पिकांवर पाणी फिरवले. तालुयातील आघार, दाभाडी, पाटणे, काटवण भागातील वडनेर, खाकुर्डी, वळवाडे, अजंग, वडेल, वजिरखेडे, वडगाव गावातील खरिपाचे अतोनात नुकसान झाले. माळमाथ्यावरील अस्ताणे, झोडगे, हाताणे, करंजगव्हाण, लेंडाणे, कुकाणे, काष्टी, डाबली येथेही जोरदार पाऊस झाला आहे.

दरम्यान, पाऊस कोसळत असताना तालुयातील मळगाव शिवारात समाधान कैलास वाकळे (१६) हा मेंढपाळ मेंढ्या चारत असताना मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळून त्यात १० मेंढ्या गतप्राण झाल्या. समाधान गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार विशाल सोनवणे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ओळखपत्र अनिवार्य आणि पेन्सिलचा वापर !

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar महाराष्ट्र शासनाने माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत असणार्‍या जुन्या नियमांचे अधिक्रमण करून राज्यात नवे महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 लागू केले...