Tuesday, November 24, 2026
Homeदेश विदेशमुरासू चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकलं; महाराष्ट्रासह 'या' राज्यांना पावसाचा इशारा

मुरासू चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकलं; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पावसाचा इशारा

पुणे | प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘मुरासू’ हे चक्रीवादळ तीव्र वेगाने किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून त्याचे रूपांतर अत्यंत भीषण चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या वादळाचा थेट आणि मुख्य फटका आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला बसणार आहे. सोमवारी दिवसभर पावसाचा प्रभाव जास्त असल्याने हिवाळ्यात पावसाळ्याचा अनुभव पुणेकरांना मिळाला. दरम्यान, मुरासु वादळामुळे राज्याच्या काही भागात पुढील २ दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात मुरासु वादळ निर्माण झाले असून, हे वादळ मंगळवारी पहाटेपर्यंत दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकले आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आणि अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातील हवामानातही मोठे बदल होणार आहेत. वादळामुळे राज्याकडे येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यात वाढ झाली असून, यामुळे रविवारपासून पावसाने हजेरी लावली आहे.

- Advertisement -

११०० कोटीच्या थकबाकीमुळे महालॅब, डायलिसिस केंद्रांना टाळे; राज्यभरातील रुग्ण मोफत आरोग्य सेवेपासून वंचित

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. 4 नोव्हेंबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडू शकतो, तसेच ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ ओंगोलच्या दक्षिणेकडे असलेल्या नेल्लोर आणि नरसापूरदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकू शकते. सोमवारी सायंकाळपूर्वीच्या 6 तासांमध्ये या चक्रीवादळाने ताशी 14 किलोमीटर वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने प्रवास केला आहे. या चक्रीवादळामुळे केवळ दक्षिण भारतच नव्हे, तर महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

#WATCH | Prakasam, Andhra Pradesh: Severe Cyclonic Storm ‘Murasu’ causes widespread damage across the district, leading to inundation in low-lying areas.

Visuals show vehicles stranded and overturned on roads. https://t.co/ATVF2qYZja— ANI (@ANI) November 3, 2026

पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा,सोलापूर,पुणे जिल्ह्यात पावसाचा प्रभाव जास्त आहे. सोमवारी दिवसभर थांबून थांबून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. दरम्यान, पुढील दोन दिवस तळकोकण,कोल्हापूर, दक्षिण मराठवाडा, विदर्भात मंगळवारी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आज (मंगळवारी) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेश: किनारपट्टीवरील प्रदेश आणि रायलसीमा भागात सलग 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
तेलंगण: मंगळवारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल.
तमिळनाडू: 7 नोव्हेंबरपर्यंत काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
ओडिशा: 4 नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो.
केरळ: 7 आणि 8 नोव्हेंबरदरम्यान काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या