Wednesday, December 4, 2024
Homeनगर1 हजार 100 भावी गुरूजींची परीक्षेकडे पाठ

1 हजार 100 भावी गुरूजींची परीक्षेकडे पाठ

14 हजार 690 उमेदवारांनी दिली शिक्षक पात्रता परीक्षा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी दोन सत्रात नगरमध्ये पार पडली. या परीक्षेच्या दोन स्वतंत्र पेपरला 1 हजार 101 उमेदवारांनी दांडी मारली. तर 14 हजार 690 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी रविवारी सकाळी सकाळी 10:30 ते दुपारी 1 पर्यंत पेपर क्रमांक एक व दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पेपर क्रमांक 2 पार पडला. परीक्षा सुरळीतपणे होण्यासाठी जिल्हा स्तरावर अध्यक्ष जिल्हा परीक्षा आयोजन व संनियंत्रण समिती तथा जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर नियोजन केले होते.

- Advertisement -

परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील हे नियंत्रण अधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस सहनियंत्रण अधिकारी होते. त्यांना उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे जिल्हा परिरक्षक व उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची सहायक जिल्हा परिरक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. परीक्षेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून मध्ये पेपर क्र.1 साठी 6 हजार 373 परिक्षार्थीपैकी 5 हजार 928 व पेपर क्र.2 साठी 9 हजार 418 परिक्षार्थीपैकी 8 हजार 762 असे 14 हजार 690 परिक्षार्थी हजर होते. परीक्षेस नगर शहर ब शहरालगत पेपर क्र.1 साठी 17 व पेपर क्र.2 साठी 28 परीक्षा केंद्र होती. सदर परीक्षेसाठी पेपर क्र. 1 साठी 4 झोनल अधिकारी, 17 सहायक परीरक्षक, 17 केंद्र संचालक, 60 पर्यवेक्षक व 272 समावेक्षक आणि पेपर क्र.2 साठी 6 झोनल अधिकारी, 28 सहायक परीरक्षक, 28 केंद्रसंचालक, 80 पर्यवेक्षक, 400 समावेक्षक यांची नियुक्ती केलेली होती.

या परीक्षेसाठी राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेमार्फत परीक्षार्थींची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीव्दारे करण्यात आली होती. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक परीक्षा दालनात, केंद्राच्या प्रवेशव्दाराबर व केंद्र संचालक यांचे नियंत्रण कक्षात सीसीटी व्ही यंत्रणा बसविण्यात आलेली होती. परीक्षार्थीना पेपर क्र.1 साठी सकाळी 9:00 वाजता व पेपर क्र.2 साठी दुपारी 1 वाजता परीक्षा कक्षात प्रवेश दिला गेला. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) चे प्राचार्य डॉ. राजेश बनकर, बाळासाहेब बुगे शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या भरारी पथकाने परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. परीक्षेसाठी मिना शिवगुंडे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जिल्हा परिरक्षक, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, जिल्हा परिरक्षक राजश्री घोडके, अधीक्षक वर्ग-2 हेमलता गलांडे, जयश्री कार्ल यांचे पथकाने साहित्य संकलनाचे कामकाज पाहिले. रमेश कासार, लेखाधिकारी, विलास साठे व सुरेश ढवळे, विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी वाहन व्यवस्था कामकाज पाहिले. मनीषा कुलट, विस्तार अधिकारी (शिक्षण), संदीप तमनर, योगेश गवांदे, मनोज चोभे, प्रशांत सदावर्ते यांनी परीक्षेचे संपूर्ण कामकाज पाहिले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या