Saturday, June 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूज५ जुलैला निघणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द- संजय राऊत

५ जुलैला निघणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द- संजय राऊत

मुंबई

राज्य सरकारच्या शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासूनच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मुंबईत येत्या ०५ जुलैला भव्य मोर्चा काढण्यात येणार होता. मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान, असा हा विराट मोर्चा असणार होता. या मोर्चात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार होते. मात्र, या मोर्चाआधी महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत त्रिभाषा धोरणाचा शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

सरकारच्या या निर्ण्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राउत यांनी आपल्या सोशियल मिडिया अकांउट ‘एकस’ वर प्रतिक्रिया देत हा मराठी माणसाच्या एकीचा विजय असून सरकारने ठाकरे बंधूंचा धसका घेतला आहे, ५ जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही; पण..
ठाकरे हाच ब्रँड! असे म्हण्टले आहे.

ताज्या बातम्या

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख; ३० जूनपासून स्वीकारणार पदभार

0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था New Delhi केंद्र सरकारने सध्या उपलष्करप्रमुख (Vice Chief of Army Staff) म्हणून कार्यरत असलेल्या लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताच्या पुढील...