मुंबई । प्रतिनिधी
पालघर येथील डहाणू तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे तालुका विधानसभा संघटक अशोक धोडी गेल्या १२ दिवसांपासून बेपत्ता होते. त्या नंतर त्यांचे अपहरण झाल्याचे समोरे आले होते. शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचं अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं होतं. दरम्यान आज सायंकाळच्या दरम्यान गुजरात राज्यामधील भिलाड या ठिकाणी येथील एका बंद खदानीत धोडी यांची चार चाकी सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर पालघर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
- Advertisement -
बंद खादानितून चारचाकी बाहेर काढल्यानंतर लाल रंगाच्या चार चाकीच्या डिक्कीत अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.