नवी दिल्ली | वृत्तसंस्था
भारतीय महिला संघापाठोपाठ भारतीय पुरुष संघानेही पहिल्या खो-खो विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेपाळच्या संघाचा पराभव करून इतिहास रचला आहे. अटीतटीच्या सामन्यात नेपाळला हरवून भारताने विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला.
- Advertisement -
भारतीय संघाने सुरुवातीला चमकदार कामगिरी केली आणि तिसऱ्या वळणावर 26-18 अशा फरकाने आघाडी घेतली. चौथ्या वळणावर भारतीय संघाने सामन्यातील आपली पकड कायम ठेवत 54-36 ने आघाडी घेत विश्वचषकावर नाव कोरले. याआधी आजच भारतीय महिला संघाने नेपाळचा ७८-४० अशा फरकाने पराभव करून विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते.
यजमान भारताचा हा आनंद पुरुष संघाने एका तासाच्या कालावधीत द्विगुणित केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा