Friday, November 27, 2026
Homeक्राईमसावकाराचा तगादा अन् सततच्या धमक्या, ७० हजारांचे ३ लाख देऊनही छळ सुरूच;...

सावकाराचा तगादा अन् सततच्या धमक्या, ७० हजारांचे ३ लाख देऊनही छळ सुरूच; अखेर व्यावसायिकानं उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

नाशिक | प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथे सावकारीच्या तगाद्याला आणि धमक्यांना कंटाळून एका सुतार व्यावसायिकाने घर-शहर बदलून नाशिक गाठले; मात्र जिल्ह्यांच्या सीमा ओलांडूनही फोनवरून सुरू राहिलेल्या दहशतीपुढे अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी आयुष्य संपवले. या प्रकरणात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, भाजपासह पोलीस वर्तुळातील वावराची चर्चा असलेल्या संशयित कार्यकर्त्यांचा जुना गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे.

मूळ नवापूर येथील रहिवासी असलेले कैलास ब्रिजलाल शिंदे यांनी २०२२ मध्ये सुतारकामाच्या भांडवलासाठी नवापूर येथील संशयित सावकार संदीप मुकेश पाटील व सुल पेचना पाटील यांच्याकडून ७० हजार रुपये व्याजाने घेतले होते. फिर्यादीनुसार, या कर्जापोटी मुद्दल व व्याजासह तब्बल ३ लाख रुपये परत करण्यात आले. नातेवाईकांनी पैसे जमवून एप्रिल २०२२ मध्ये व्यवहार मिटवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतरही उरलेले व्याज बाकी आहे, या कारणावरून भिशी व रोखीच्या माध्यमातून तगादा सुरूच राहिल्याचा आरोप आहे. या सततच्या दहशतीला कंटाळून २०२२ च्या अखे रीस शिंदे कुटुंबीयांनी दोन मुलांसह नवापूर सोडले आणि नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील जुईनगर येथील एका सोसायटीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये स्थलांतर केले.

- Advertisement -

नाशिकमध्ये आल्यानंतरही कैलास शिंदे यांनी सुतारकाम सुरू केले; मात्र व्यवसायात मंदी आल्यानंतर पुन्हा फोनवरून धमक्यांचे सत्र सुरू झाल्याचा आरोप आहे. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी कैलास शिंदे घरी एकटे असताना त्यांनी पत्नी व मुलांना कॉल करून, मुलांची काळजी घे, त्यांना रागावू नको, असे सांगत फोन ठेवला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी जुईनगर येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. संशय आल्याने दीर सौरव हिरे यांना घरी पाठवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येपूर्वी आणि त्यानंतरही संदीप पाटीलने कॉल केल्याचा फिर्यादीत करण्यात आला आहे. पत्नी योगिता शिंदे यांच्या फिर्यादीवरून २५ नोव्हेंबर रोजी रात्री म्हसरूळ पोलीस ठाण्यात अवैध सावकार संदीप मुकेश पाटील व सुलोचना पाटील यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, तसेच भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादकीय : २७ नोव्हेंबर २०२६ – शेजारधर्मातून समृद्धीची वाट

तो तर भाजप कार्यकर्ता
संशयित संदीप पाटील याच्यावर सन २०१५, २०१७ आणि २०१८ मध्ये नंदूरबार व नवापूरात गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली असून, भाजपच्या उपरण्यांसह तसेच वरिष्ठ नेते व पोलीस अधिकाऱ्यांसोबत विविध कार्यक्रमांत तो झळकत असल्याचे दिसून येते.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने खासदारांना बजावला व्हीप; संसदेच्या...

0
मुंबई | Mumbaiसंसदेच्या विशेष अधिवेशन सोमवार ३० नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)...