कोठुरे। वार्ताहर Kothure
- Advertisement -
कोठुरे परिसरात गुरुवारी (दि.10) रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील शेतकरी मोतीराम मोगल यांच्या बंगल्याच्या आवारामध्ये रात्री बिबट्याने श्वानाची शिकार केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रीत झाला. मोगल यांनी वनविभागाला याबाबत कळवले असून, वनविभागामार्फत येथे पिंजरे लावण्याची प्रतीक्षा केली जात आहे. परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी या क्षेत्राचा उपयोग होतो.
परिसरात नित्यनेमाने बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने पिंजरे लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांमधून होत आहे.




