Monday, September 28, 2026
Homeनाशिकभरवस्तीत चोरीचा प्रकार; चोरट्याने धारदार वस्तूचा धाक दाखवून साडेपाच लाखांचा ऐवज लांबवला

भरवस्तीत चोरीचा प्रकार; चोरट्याने धारदार वस्तूचा धाक दाखवून साडेपाच लाखांचा ऐवज लांबवला

देवळा | प्रतिनिधी
येथील ज्ञानेश्वरनगर वाखारी रोड परिसरातील भरवस्तीत असलेल्या बंगल्यात चोरीचा प्रकार घडला असून अज्ञात चोरट्यांनी धारदार वस्तूचा धाक दाखवून साडेपाच लाखांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली.

वाखारी रोड ज्ञानेश्वरनगर येथील संगीता विलास ठाकरे या आपल्या मुलांसोबत गुरुवारी (दि.१८) सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान आपल्या कामकाजासाठी नाशिक येथे निघाल्या असता अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेऊन घरात कोणी नसल्याचा फायदा उठवत घराचा कडी-कोयंडा तोडून सोने व रोख रकमेसह साडेपाच लाखांचा ऐवज भरदिवसा लंपास केला.

- Advertisement -

दरम्यान, आजूबाजूच्या लोकांना शंका आल्याने त्यांनी त्यास विचाराणा केली असता त्यांच्या हातातील धारदार वस्तूचा धाक दाखवून आपल्या पॅशन प्रो गाडीवरून पोबारा केला. यामुळे देवळा शहरात भरदिवसा अशाप्रकारे धाक दाखवून चोऱ्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत संगीता ठाकरे यांनी देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास देवळा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दामोदर काळे करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

शरद

Sharad Pawar NCP: आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत...

0
मुंबई | Mumbaiराज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष...