Thursday, March 13, 2025
Homeनाशिकनाट्यगृहे कथा अन् व्यथा : दादासाहेब गायकवाड सभागृह समस्यांच्या विळख्यात

नाट्यगृहे कथा अन् व्यथा : दादासाहेब गायकवाड सभागृह समस्यांच्या विळख्यात

नाशिक | फारुक पठाण | Nashik

नाशिक शहरातील (Nashik City) मनपाचे सर्वात मोठे सभागृह म्हणजे मुंबईनाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृहे. (Dadasaheb Gaikwad Hall) विविध राष्ट्रीय, राज्यस्तरीय तसेच स्थानिक पातळीवरील लहान-मोठे कार्यक्रम याच ठिकाणी होतात. तर नियमित महत्त्वाच्या लोकांची येथे उपस्थिती असते. असे असले तरी या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात सुविधा नसल्याने नागरिकांमध्ये (Citizens) नाराजी आहे. नियमित सफाई होत नसल्याने सभागृह परिसरात घाणीचे ढीग पडून राहतात. तर भिंतींवर पान, गुटखा खावून थुंकलेले आहे. मनपाने त्वरित याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

दादासाहेब गायकवाड सभागृह व बाहेरील भागात घाणीचे साम्राज्य पसरले असून नियमित देखभालीचा अभाव आणि स्वच्छतेची कमतरता यामुळे स्थानिक नागरिक तसेच तिथे येणाऱ्या लोकांमध्ये नाराजी व्यक्त होत असते. सभागृहाचा उपयोग महत्त्वाच्या बैठकींसाठी, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आणि महापालिकेच्या विविध उपक्रमांसाठी होतो. मात्र अशी स्थिती असल्याने हे सभागृह केवळ नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) कार्यक्षम तेवरच नाही तर शहराच्या स्वच्छतेच्या प्रतिमेवरही नकारामत्क परिणाम करत आहे.

महापालिकेने या समस्येची गंभीर दखल घेऊन त्वरित सभागृह व त्या भागातील स्वच्छता आणि देखभाल करावी, स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून नियमित साफसफाई करावी, या ठिकाणी संपूर्ण परिसरात आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावून योग्य देखरेख करावी, सभागृहाच्या वापरासाठी येणाऱ्या लोकांसाठी स्वच्छता नियम कडक करण्याची गरज आहे. नाशिक महापालिकेचे दादासाहेब गायकवाड सभागृह अनेक महत्त्वाच्या बैठकींसाठी आणि उपक्रमांसाठी वापरले जाते, मात्र सध्या त्याची दुरवस्था झाली आहे. सभागृहाच्या स्वच्छतेचा अभाव, तुटलेली आणि जीर्ण झालेली साधनसामुग्री तसेच परिसरात सर्वत्र कचरा व घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. हे चित्र बदलणे गरजेचे आहे.

दरम्यान, सध्या घाणीचे साम्राज्य दिसत असून सभागृहाच्या आतील आणि बाहेरील भागात कचऱ्याचे ढीग दिसून येतात. स्वच्छतेसाठी नेमलेले कर्मचारी दिसत नाहीत, त्यामुळे कचऱ्याची नियमित साफसफाई होत नाही. देखभाल आणि दुरुस्तीचा अभाव असून सभागृहातील खुर्च्छा तुटलेल्या स्थितीत असून, भिंतींवर डाग आणि रंग उडालेला आहे. एसी यंत्रणा नादुरूस्त असल्याने सभागृहात दमट वातावरण असते. लाईटिंग सिस्टीम आणि साऊंड सिस्टीमही बिघडलेली असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेक वेळा विविध कार्यक्रमांत (Programs) अडथळेदेखील आलेले आहेत.

मनपाने लक्ष द्यावे

नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या असल्या तरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्याकडे लक्ष न दिल्यामुळे समस्या वाढली असून या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांवर देखील परिणाम झाला आहे. खराब साऊंड आणि एसी व्यवस्थेमुळे पाहुण्यांमध्ये नाराजी निर्माण होते. स्वच्छतेच्या अभावामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. म्हणून सभागृहाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी त्वरित विशेष निधी मंजूर करून कामांना सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठोस उपाय करावेत. स्मार्ट व्यवस्थापन प्रणाली आणावी, सभागृहाच्या देखभालीसाठी स्मार्ट मॉनिटरिंग प्रणाली लागू करावी, वार्षिक देखभाल व दुरुस्तीचा कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करावी.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...