चांदवड | प्रतिनिधी chandwad
शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या सोमवार पेठेतील वैभव ज्वेलर्स या दुकानांवर बुधवार दि १५ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडत सोन्याचांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या सोमवार पेठेतील डुंगरवाल संकुलातील मुख्य रस्त्यावरील प्रदीप चांदमल डुंगरवाल याचे वैभव ज्वेलर्स या नावाने दुकान असून बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानांचे शटर गँस कटरच्या साहाय्याने कट करुन व आतील ग्रिल जाळीचे कुलुपे धारधार हत्याराने कट करुन दुकानात प्रवेश करीत दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायरी तोडून टाकल्यात तसेच मुख्यबाजार पेठेत सदर प्रकार घडल्याने चांदवडकर नागरीक अचंबित झाले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
यावेळी चोरट्यांनी ४ लाख ५० हजार रूपये किमतीचे ९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यात मणी, मुरणी,नथ,डाय व बारीक बॉल,चेनचे तुकडे, कानातले टॉप्स, रिंगा, स्प्रंग बाळया, प्लेन बाळया तसेच ६ लाख रुपये किंमतीचे एकृण १२ किलो वजनाचे चांदीचे दागिने,५० हजार किमतीचे विविध राशीचे मोती,२२ हजार रुपये रोख असा एकूण ११ लाख २२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडल्याची फिर्याद मालक डुंगरवाल यांनी चांदवड पोलिसांत दिली आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ करीत आहेत.