Sunday, August 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजजिल्हा परिषदेच्या शाळेत चोरट्यांचा डल्ला

जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरट्यांचा डल्ला

संगणक व पोषण आहाराच्या वस्तू नेल्या चोरून

- Advertisement -

वावी । वार्ताहर Vavi

तालुक्यातील दुसंगवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतून अज्ञात चोरट्यांनी संगणक व लहान मुलांच्या पोषण आहाराची चोरी केल्याची घटना बुधवारी (दि.25) रात्रीच्या वेळी घडली. गुरुवारी (दि.26) सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.

शाळेच्या शिक्षिका जयश्री खैरनार नेहमीप्रमाणे आज सकाळी शाळेत आल्या असता त्यांना शाळेचा दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन बघितले असता त्यांना सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्याने त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी शाळेचे रबरी शिक्के, संगणक, पोषण आहार व त्याचे मसाले व डाळ चोरून नेल्याचे दिसून आले.

यावर खैरनार यांनी तत्काळ सरपंच कानिफनाथ घोटेकर यांच्याशी संपर्क करून पोलीस ठाण्यास माहिती दिली. मागील दोन आठवड्यांपासून वावी पोलीस ठाणे हद्दीत चोरीचे सत्र सुरू आहे. मात्र, अद्याप कोणत्याही चोरीचा सुगावा लागत नाही. दिवसेंदिवस चोरीच्या प्रमाणात वाढ होत असून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : कागदावरील स्मार्ट सादरीकरण अन् रस्त्यावर २५ फुट खड्डा!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिंहस्थाच्या ध्वजारोहणासाठी आता अवघे दोन महिने उरलेले असताना कुंभमेळा आयुक्तांनी, काळजी नको, सगळं काही ठीक होईल,...