Friday, September 11, 2026
Homeनाशिकदागिन्यांसह रोकड लंपास

दागिन्यांसह रोकड लंपास

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

सोयगाव परिसरातील इंदिरा नगरात घर-किराणा दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट व दुकानाचा गल्ला फोडून दोन लाखाचे सोन्याचे दागिने व पाच लाखाची रोकड असा सुमारे सात लाखाचा एैवज लंपास केला. काल मध्यरात्री 12 ते 2 वाजेच्या सुमारास मध्यवस्तीत हा धाडसी घरफोडीचा प्रकार घडल्याने रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, या चोरीची माहिती मिळताच कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत तपासास प्रारंभ केला. ठसे तज्ञ पथकास पाचारण करत चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

इंदिरानगर भागातील कालिका किराणा व दुध डेअरीचे संचालक शामसिंग सोळंकी हे सोमवारी नातेवाईकांसमवेत त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी गेले होते. कुणाल व डॉ. अतुल हे दोन्ही मुले घरीच होते. रात्री दुकान बंद करून दोन्ही मुले वरच्या मजल्यावर झोपण्यास गेले होते. मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास मालेगावी परतलेल्या शामसिंग सोळंकी यांनी रिक्षा मिळत नसल्याने मुलगा कुणाल यास फोन करीत घेण्यासाठी यावयास सांगितले.

कुणाल खाली आला असता दरवाजाची कडी बाहेरून कुणीतरी लावल्याचे लक्षात आल्याने त्याने शेजारी राहणार्‍यांना फोन करीत कडी उघडण्यास सांगितले. कुणाल बाहेर आला असता त्यास घर व दुकानाचे कुलूप तोडलेले आढळून आले. घरात व दुकानात सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले तसेच फोडलेल्या कपाट व गल्ल्यातून दोन लाखाचे दागिने व पाच लाखाची रोकड चोरट्यांनी लांबवल्याचे लक्षात आले. या चोरीची माहिती शामसिंग यांनी कॅम्प पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत तपासास प्रारंभ केला. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात सोळंकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

BRICS

BRICKS Summit 2026: BRICSचा महासंगम! मोदी, पुतीन, शी जिनपिंग एकाच मंचावर...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताच्या अध्यक्षतेखाली १८वी BRICS शिखर परिषद (18th BRICKS Summit 2026) १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत...