शेगाव – दिपक सुरोसे
हालातो से हम हारने वाले नही ‘आज हवा तुम्हारी है कल तुफान हमारा है’
अशा शेरो शायरीसह मुला-मुलींनी शिक्षणा बरोबरच लढावू बाणा ठेवला पाहिजे, सावित्रीबाईंनी टाकलेले पाऊल सामाजिक क्रांतीची सुरुवात आहे, मुलींना शिक्षण द्या असे माजी उपपुख्यमंत्री तथा ओबीसीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शेगाव येथील माळी समाज राज्यस्तरीय परिचय मेळाव्यात बोलताना सांगितले.
मराठा आरक्षणाला विरोध नाही
मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओ बी सी वर अन्याय होता कामा नये, इतर राज्यांनी ews स्वीकारले मात्र महाराष्ट्रात विरोध कशासाठी अनेक ओबिसीची दुकाने जाळलित, हे कशासाठी. आरक्षण मिळाले म्हणजे लगेचच घरावर सोन्याचे कौल पडत नाही माझ्यावर अन्याय झाला मात्र मी खचून गेलो नाही मी लढत आहे आणि लढत राहणार असे सांगत त्यांनी ओबीसी बद्दल दिलेला लढा याबाबत माहिती देत वेळेने कितीही मनमानी केली असेल तरीही मी लढतच राहणार हे सांगून त्यांनी दिलेला ओबीसी लढा, महात्मा फुलेंचे कार्य, व शिक्षणा बरोबरच लढावू बाणा ठेवा असे सांगून उपस्थित पालक युवक युवतींना शुभेच्छा दिल्या.
31व्या माळी समाज राज्य स्तरीय परिचय संमेलन शेगाव येथे आज दुसऱ्या दिवशी च्या सत्राला मार्गदर्शन करण्यासाठी श्री.भुजबळ आले होते. याप्रसंगी मंचकावर माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी आमदार कृष्णराव इंगळे, आ.मनोज कायदे, मेळाव्याचे अध्यक्ष डॉ.शंकरराव क्षीरसागर, कार्याध्यक्ष महादेव खंडारे, माजी आमदार तुकारामजी बिडकर, माजी आमदार बळीराम सिरसकार, संतोष खांडे भराड, डी एस खंडारे, डॉ.भास्कर चरखे, प्रकाश भाऊ तायडे, महेश गणगणे, स्वाती ताई वाकेकर, श्रीकृष्ण बोळे, सुरेश गीऱ्हे, सुभाष नीखाडे आदी सह मान्य वर उपस्थित होते.
याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रम आयोजन समिती अकोला खामगाव विभागाने केले होते. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप सातव, प्रास्ताविक, शंकरराव क्षीरसागर, अजय तायडे, यांनी तर आभार अनिल गीऱ्हे यांनी मानले कऱ्यक्रमा हजारो समाज बांधव उपस्थित होते.