जळगाव । प्रतिनिधी Jalgaon
शहर एवं तहसील माहेश्वरी सभेचे अध्यक्ष योगेश कलंत्री (President of Maheshwari Sabha Yogesh Kalantri) यांची कन्या सिमरन हिने वाढदिवस धामधूममध्ये साजरा न करता त्यानिमित्त उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता नवीन बसस्थानकात थंडगार शुद्ध पाण्याच्या जारच्या (Jars of water) पाणपोईची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा शुभारंभ एस. टी.चे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्याहस्ते करण्यात आला. या स्तुत्य उपक्रमामुळे प्रवाशांची तहान (Thirst) भागवली जात आहे.
कडक उन्हामुळे जीवाची लाही लाही होते. प्रवासाच्या धावपळीत प्रवाशांना अधिक तहान लागते. गरीब, सर्वसामान्य प्रवाशांना नेहमी विकतचे थंड पाणी (Cold water) घेणे परवडत नाही. त्यामुळे ते त्यांची पाण्याची तहान चांगल्या प्रकारे भागवू शकत नाहीत. ही बाब लक्षात घेता माहेश्वरी सभेने (Maheshwari Sabha) सुरू केलेला हा पाणपोईचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे.
या पुण्य कार्यामुळे असंख्य प्रवाशांची तहान भागणार आहे, असे मत एस. टी.चे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी व्यक्त केले. हा उपक्रम संपूर्ण उन्हाळा भर सुरू राहील, असे योगेश कलंत्री यांनी सांगितले. या पाणपोईचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन सचिव विलास काबरा यांनी केले.
माहेश्वरी सभा वेळोवेळी अनेक समाजोपयोगी, प्रेरणादायी उपक्रम राबवित असते. त्याचा लाभ गरजू घटकांना अधिक होतो, असे महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे प्रसिध्दी विभागाचे सचिव गोपाळ पाटील यांनी नमूद केले.
यावेळी एस. टी.चे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, आगार व्यवस्थापक मनोज तिवारी, माहेश्वरी सभेचे सल्लागार बी.जे.लाठी, रुख्मिणी फाऊंडेशनचे श्रीकांत वाणी, सचिन मणियार, केदार मुंदडा, जगदिश गिलडा, परमा गिलडा, संगिता कलंत्री, चिन्मय कलंत्री, माणकचंद झवर, अभय बियाणी, मनीष लढ्ढा, ममता लढ्ढा, कृष्णा जोशी आदी उपस्थित होते.





