Wednesday, January 15, 2025
Homeनाशिकटेम्पो-जीप अपघातात तिघांचा मृत्यू; ७ जण गंभीर जखमी

टेम्पो-जीप अपघातात तिघांचा मृत्यू; ७ जण गंभीर जखमी

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

पालघर जिल्ह्यातील जव्हार -विक्रमगड मार्गावर जव्हारमधील वाळवंटा येथे दोन वाहनांच्या धडकेत दिंडोरी तालुक्यातील आंबेगण येथील तिघांंचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

जव्हार विक्रमगड मार्गावर विरार येथे जीवदानी मातेच्या दर्शनासाठी जाणार्‍या आंबेगण येथील भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर सात भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जव्हार येथील पतंगशहा कुटीर रुग्णालय आणि नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गंगुबाई दशरथ कोरडे, निवृत्ती गणपत पागे, सुंदराबाई निवृत्ती पागे ही मृतांची नावे आहे. हा अपघात वाळवंडा येथील डॉन बॉस्को स्कूल समोर जीप आणि आयशर टेम्पोमध्ये झाला असून जीपचा पूर्ण चक्काचूर झाला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या