Thursday, July 2, 2026
Homeनाशिकनाशिककरांनो मुले सांभाळा : अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू

नाशिककरांनो मुले सांभाळा : अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू

इंदिरानगर | वार्ताहर

चेतनानगर येथील नागरे मळा परिसरातील अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरून पडून तीन वर्षाचा बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (दि२७) रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास सम्राट सिंमफनी नागरे मळा चेतना नगर येथे शौर्य राजेंद्र पाटील(वय ३) हा सहाव्या मजल्यावर राहत्या घरातील गॅलरीत खेळत असताना खाली पडला.

शौर्यच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास औषध उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात येथे दहा वाजता दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

ताज्या बातम्या

Nasik News : एसटी महामंडळाचे ११ अधिकारी तडकाफडकी निलंबित

0
​नाशिक । प्रतिनिधी Nashik एसटी महामंडळाच्या नाशिक आणि अमरावती विभागांतर्गत सुरू असलेल्या ढिसाळ, मनमानी आणि भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करत परिवहन मंत्रालयाने सर्वात मोठी कारवाई केली...