Tuesday, December 3, 2024
Homeक्राईमसावकारांच्या छळास कंटाळून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

सावकारांच्या छळास कंटाळून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

सावकारांच्या (Lender) त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा मजकूर डायरीमध्ये लिहून अरणगाव (Arangav) येथील कालिदास अभिमन्यू मिसाळ (वय 40) या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. या प्रकरणी तीन सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार जामखेड पोलीस ठाण्यात (Jamkhed Police Station) गुन्हा दाखल झाला असून यामध्ये एका महिला सावकाराचा समावेश आहे. या घटनेने जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

आलेश बाबुराव जगदाळे (रा. जामखेड), भगवान रामा जायभाय (रा. वंजारवाडी, ता. जामखेड) व शायरा नियमत सय्यद (रा. पाटोदा, गरडाचे, ता. जामखेड) अशा तीन सावकारांविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मयताचा भाऊ जगदीश अभिमन्यू मिसाळ (वय 43 रा. अरणगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या