Thursday, September 10, 2026
HomeनगरAccident News : तिरुपतीला गेलेल्या शेवगावातील तिघांचा अपघाती मृत्यू

Accident News : तिरुपतीला गेलेल्या शेवगावातील तिघांचा अपघाती मृत्यू

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

तिरुपती बालाजीचे दर्शन (Tirupati Balaji) घेऊन गावी परतत असताना मंगळवारी पहाटे (दि.8) आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) अनंतपूर जिल्ह्यातील उरवकोंडा परिसरात कार उलटल्याने झालेल्या अपघातात (Car Accident) शेवगाव येथील तिघांचा जागीच मृत्यू (Death) झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

- Advertisement -

सौरव विष्णू अकोलकर (रा. हातगाव), तुषार सुनील विखे (रा. सोनविहीर), श्रीकांत थोरात (रा. शेवगाव) हे तीन तरुण जागीच ठार (Death) झाले. तर सुमित अकोलकर हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी उरावकोंडा (Uravakonda) सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उरावकोंडा मंडळाजवळील बुडागावी गावात कार चालवणार्‍याचे ताबा सुटल्याने कार उलटल्याचे समजते. उरावकोंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

या दुर्दैवी दुर्घटनेमुळे शेवगाव (Shevgav) तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अपघाताचे वृत्त समजतात संबंधित तरुणांचे नातेवाईक तसेच मित्रपरिवार घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ताज्या बातम्या

पडसाद : तुमचा होतो खेळ, शिक्षकांचा जातो जीव!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक तुमचा होतो खेळ, आमचा जातो जीव’ अशी एक उक्ती आपण अनेकदा ऐकत असतो. दोन बड्यांच्या वादात...