Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमBribery News : तोफखाना पोलीस ठाण्याचा अंमलदार लाचेच्या जाळ्यात

Bribery News : तोफखाना पोलीस ठाण्याचा अंमलदार लाचेच्या जाळ्यात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदाराला 35 हजार रूपयांची लाच स्वीकारताना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी (15 एप्रिल) सायंकाळी तोफखाना पोलीस ठाणे परिसरात ही कारवाई करण्यात आली. अनिल गोसावी असे पकडलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव असून या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

छळ प्रकरणी पीडित विवाहितेने पतीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान संबंधित संशयित आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस अंमलदार अनिल गोसावी याने तक्रारदाराकडे 50 हजार रूपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. बुधवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास तोफखाना पोलीस ठाणे परिसरात ही कारवाई करण्यात आली.

सापळ्यानुसार, गोसावी याने 50 हजारांच्या मागणीपैकी 35 हजार रूपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. तक्रारदाराकडून 35 हजार रूपये स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या घटनेची माहिती पोलीस दलात पसरताच पोलीस ठाण्यात मोठी खळबळ उडाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोसावी याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) मंगळवारी राहाता...