Thursday, May 2, 2024
Homeनगरतोफखाना पोलीस ठाण्याची गुन्हे शाखा बरखास्त

तोफखाना पोलीस ठाण्याची गुन्हे शाखा बरखास्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याची गुन्हे प्रगटीकरण शाखा (डीबी) बरखास्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तोफखाना पोलीस ठाण्यास भेट दिली असता दाखल गुन्ह्यांचा तपास शून्य दिसून आल्याने तोफखाना पोलीस ठाण्याची डीबी बरखास्त करण्यात आली. तोफखाना पोलीस ठाण्यातील या शाखेत दहा जणांची नियुक्ती होती.

शहरातील तोफखाना पोलीस ठाणे नेहमीच चर्चेत असते. गेल्या दोन महिन्यांपासून तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैन स्नॅचिंग, घरफोडी, दरोडा आदी गुन्ह्यांची वाढ झाली आहे. यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर तपासात कोणत्याही प्रकारची समाधानकारक प्रगती दिसत नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मंगळवारी दुपारी तोफखाना पोलिस ठाण्यास भेट दिली.

यावेळी त्यांनी दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला असता त्यांना तपास शून्य दिसून आला. यावेळी अधीक्षक मनोज पाटील यांनी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांना डीबी बरखास्त करण्याची सूचना दिली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी डीबी बरखास्त केली. पुढील आठ दिवसांमध्ये नव्याने डीबीची नियुक्ती केली जाईल असे निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या