Monday, April 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजयुवतीवर अत्याचार; यंत्रमाग उद्योजकास पोलीस कोठडी

युवतीवर अत्याचार; यंत्रमाग उद्योजकास पोलीस कोठडी

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

वडिलांच्या उपचारासाठी मदत मागण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी येथील यंत्रमाग उद्योजक व एमआयएमचे पदाधिकारी युसूफ इलियास यांना आयेशानगर पोलिसांनी अटक केली आहे. युसूफ इलियास हे आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचे निकटवर्तीय असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

यंत्रमाग उद्योजक व राजकीय नेते असलेले मोहंमद युसूफ मोहंमद इलियास (५४, रा. हुसेनशेठ कंपाऊंड) यांच्याकडे आपल्या अर्धांगवायूने पिडीत असलेल्या पित्यासाठी मदत मागण्याकरिता सदर अत्याचारीत युवती गेली होती. तिच्या गरीबीचा फायदा घेत मोहंमद युसूफ याने तिला त्याच्या हुसेनशेठ कंपाऊंडमधील कार्यालयात पैसे घेण्यासाठी बोलवले. तेथे त्याने जानेवारी २०२५ मध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हे अत्याचार करतांना त्याने त्याचे चित्रण मोबाईलमध्ये केले. यावेळी त्याने सदर पिडीत युवतीला तीन हजार रूपये देवून घडलेल्या प्रकाराची वाच्यता करू नये अशी धमकी दिली. तसेच तिचे आक्षेपार्ह व्हीडीओ प्रसारीत करण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पिडीत मुलीच्या वडिलांना पक्षाघात झाला असल्याने आजारी आहेत. घरची परिस्थिती गरीबीची असल्याने तिने युसूफ इलियास यांच्याकडे मदतीची याचना केली होती. दरम्यान सदर पिडीत मुलगी सामान्य रूग्णालयात रडत असतांना एका महिलेने तिची विचारपूस केली असता तिने हा प्रकार सदर महिलेजवळ कथन केला. या महिलेच्या मदतीने पिडीत युवतीने शनिवारी रात्री आयेशानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने पोलिसांनी याप्रकरणी पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत युसूफ इलियास यास अटक केली आहे. युसूफ इलियास यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

दरम्यान, आमदार समर्थक असलेल्या या दुसर्‍या राजकीय कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यापुर्वी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचे समर्थक असलेल्या शफिक राणा यांना देखील लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन महिन्यांपुर्वी पोलिसांनी अटक केली आहे. शफिक राणा यांनी त्यांच्या यंत्रमाग कारखान्यात काम करणार्‍या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शफिक राणा सध्या नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सर्वप्रथम शिर्डीत पोहोचले खरातचे ‘डर्टी पिक्चर्स’

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik स्वतःला अवतार मानणार्‍या अशोक खरातचे काळे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे कोणत्याही बाहेरील यंत्रणेपेक्षा त्याच्या आतल्या गोटातील माणसांनी दाखवलेले धाडस निर्णायक ठरल्याचे उघड झाले...