Thursday, March 13, 2025
Homeनगरऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचा अपघात; एक जागीच ठार

ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचा अपघात; एक जागीच ठार

दोघे गंभीर जखमी

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील धामणगाव आवारी (Dhamangav Avari) गावातील चिंचखांड घाटात अगस्ति कारखान्यास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी (Tractor Accident) होऊन एकजण जागीच ठार (Death) तर दोघे गंभीर जखमी झाल्याची दुदैवी घटना सोमवारी रात्री घडली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, की सोमवारी (दि.10) रात्री 12 वाजेच्या सुमारास ऊस घेऊन अगस्ति कारखान्याकडे जात असताना घाटात चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Accident) झाला. यामध्ये धुडकू कथा अहिरे (वय 20, रा. खरडे, ता. चाळीसगाव) हा जागीच ठार झाला आहे, तर उखा रतन मोरे (रा. पिंपरखेड, चाळीसगाव) याच्यासह अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे.

- Advertisement -

या अपघातातील जखमींवर अकोलेतील (Akole) खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात घडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ नामदेव कोंडिबा गावंडे हे घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मदतकार्य सुरु केले. या घटनेची माहिती कारखाना प्रशासनाला समजताच कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर व कार्यकारी संचालक सुधाकर कापडणीस यांनी तातडीने शेतकी अधिकारी सतीष देशमुख, संजय राठोड, नथू राठोड, खंडू आवारी, संपत चौधरी, पप्पू नाईकवाडी यांना घटनास्थळी पाठवून मदत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पोलीस कर्मचारी महेंद्र गुंजाळ, संदीप भोसले, रोहिदास पावसे, सोमनाथ पटेकर, रुग्णवाहिकाचालक गणेश हासे, बिरबल वाकचौरे, दोन जेसीबी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरु केले. रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्याला अडथळा निर्माण होत होता. मंगळवारी पहाटेपर्यंत जखमींना (Injured) बाहेर काढण्याचे काम सुरु होते. याप्रकरणी अकोले पोलिसांत (Akole Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अकोले पोलीस करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...