Saturday, May 9, 2026
HomeUncategorizedStampede Incident : धक्कादायक! देवीच्या दर्शनावेळी चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Stampede Incident : धक्कादायक! देवीच्या दर्शनावेळी चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेकजण जखमी

दिल्ली । Delhi

उत्तराखंडमधील हरिद्वार येथील प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात रविवारी सकाळी चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. मंदिरात जमलेल्या मोठ्या गर्दीमुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -

प्रशासनाच्या माहितीनुसार, रविवार असल्याने मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. सकाळच्या वेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या वाढल्याने मंदिरातील जिन्यावर ही दुर्घटना घडली. प्राथमिक तपासात, विजेचा धक्का लागल्याने गोंधळ निर्माण झाला आणि त्यातून चेंगराचेंगरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि भाविकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. मदत आणि बचावकार्य त्वरित सुरू करण्यात आलं. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांचा अचूक आकडा अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं त्यांनी सांगितलं. मंदिर परिसरात तणावाचं वातावरण असून भाविकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ही घटना घडल्यानंतर मंदिर प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी भाविकांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मंदिरात गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

या दुर्घटनेमुळे हरिद्वारसह संपूर्ण उत्तराखंडमध्ये शोककळा पसरली आहे. प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, यापुढे अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर पावलं उचलली जाणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. जखमींच्या प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ताज्या बातम्या

Maharashtra weather update : राज्यातील वातावरणात मोठा बदल! अवकाळी पावसाचा इशारा;...

0
मुंबई । Mumbai राज्यातील बदलत्या हवामानाने पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे आता अवकाळी पावसाचा प्रभाव अधिक...