Wednesday, June 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : लसीकरणानंतर काही अंतरावर १६ वर्षीय मुलगी कोसळली; उपचारापूर्वीच मृत्यू

दुर्दैवी : लसीकरणानंतर काही अंतरावर १६ वर्षीय मुलगी कोसळली; उपचारापूर्वीच मृत्यू

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

- Advertisement -

खुटवडनगर परिसरात महापालिकेच्या लसीकरण शिबिरात लस घेतल्यानंतर काही वेळातच १६ वर्षीय मुलगी अचानक चक्कर येऊन कोसळून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.

खुटवडनगर परिसरातील संकटमोचन हनुमान मंदिर येथे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण शिबिरात श्रावणी अनिल पाटील (वय १६) ही बुधवारी दुपारी वडिलांसोबत सर्पदंश व श्वानदंश प्रतिबंधक लस घेण्यासाठी शिबिरात आली होती. लस घेतल्यानंतर ती जवळील मेडिकलकडे जात असताना अचानक तिला चक्कर आली आणि ती रस्त्यावर कोसळली. यावेळी तिच्या डोक्याला मार लागल्याचे सांगितले जाते.घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि नागरिकांची गर्दी झाली होती. लसीकरणानंतर अल्पावधीतच मुलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी संबंधित यंत्रणांकडून आवश्यक चौकशी सुरू करण्यात आली असून नागरिकांनीही संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मयत श्रावणीच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे.

ताज्या बातम्या

हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाची पोलिसांकडून धिंड

0
सिन्नर | वार्ताहर Sinnar शहरातील बसस्थानक परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या एका तरुणाला सिन्नर पोलिसांनी आज (दि. 24) अटक करून त्याची शहरातून धिंड काढली....