Saturday, October 3, 2026
Homeक्राईमNashik News: त्र्यंबकेश्वर पेड दर्शन घोटाळा प्रकरण, पुरुषोत्तम कडलगला अखेर अडीच महिन्यांनी...

Nashik News: त्र्यंबकेश्वर पेड दर्शन घोटाळा प्रकरण, पुरुषोत्तम कडलगला अखेर अडीच महिन्यांनी जामीन मंजूर

नाशिक | प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथील बहुचर्चित पेड दर्शन घोटाळ्यातील मुख्य संशयित पुरुषोत्तम कडलग याला अखेर अडीच महिन्यांनी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गुरुवारी (दि. २५) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने काही अटी व शर्ती घालत कडलगला दिलासा दिला. दरम्यान, या घोटाळ्यातील उर्वरित चार संशयित मात्र अद्यापही तुरुंगातच आहेत.

त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या व्हीआयपी आणि पेड दर्शन पावती पुस्तकात फेरफार करून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप कडलगवर आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी १४ एप्रिल रोजी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर तपासाची व्याप्ती पाहता पोलिसांच्या मागणीनुसार जिल्हा न्यायालयाने त्याला तीन वेळा पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत (तुरुंगात) करण्यात आली होती.

- Advertisement -

Raj Thackeray: दोन गुजराती बसलेत म्हणून वाट्टेल ते कराल? राज ठाकरेंनी जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं, म्हणाले, वाट्टेल ते…

यादरम्यान कडलगने जिल्हा न्यायालयात अनेकदा जामिनासाठी अर्ज केले, मात्र न्यायालयाने त्याचे सर्व अर्ज फेटाळून लावले होते. जिल्हा न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने अखेर कडलगने वकिलामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर गुरुवारी (दि. २५) उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद् ऐकल्यानंतर न्यायालयाने पुरुषोत्तम कडलग याला सशर्त जामीन मंजूर केला.

ताज्या बातम्या

कुमकुम

अमरावतीच्या कुमकुम मोहोदचा ‘गोल्डन ॲरो’! वैयक्तिक रिकर्व्हमध्ये भारताला पहिले सुवर्ण

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiमहाराष्ट्राच्या अमरावतीची अवघी १७ वर्षांची कुमकुम मोहोड हिने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये तिरंदाजीच्या महिला वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात ऐतिहासिक...