Wednesday, May 20, 2026
Homeक्राईमNashik Crime News: सातपूरमध्ये दिवसाढवळ्या व्यावसायिक महिलेची पोत खेचली

Nashik Crime News: सातपूरमध्ये दिवसाढवळ्या व्यावसायिक महिलेची पोत खेचली

नाशिक | प्रतिनिधी
शहरातील सातपूर परिसरातील जाधव संकुल भागात दिवसाढवळ्या चैन स्नॅचिंगची धाडसी चोरीची घटना घडली आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे साडेसात वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने दुकानात ग्राहक म्हणून प्रवेश केला. संबंधित महिला व्यावसायिकेकडे सुट्टे पैसे मागण्याच्या बहाण्याने त्याने संवाद साधला. त्यानंतर संधी साधत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पोत हिसकावून आरोपीने तेथून पळ काढला. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामध्ये आरोपी आधीपासूनच परिसरात संशयास्पदरीत्या वावरत असल्याचे आणि योग्य संधीची वाट पाहत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

- Advertisement -

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी एकच जागा, पण सहा जणांमध्ये रस्सीखेच, सुनेत्रा पवार कोणाची निवड करणार?

घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाणे पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे सातपूरसह भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीस तपास वेगाने सुरू असून, परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.

ताज्या बातम्या

नांदगावला पावसाची हजेरी

0
नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon सूर्य आग ओकत असताना सायंकाळी अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. बुधवारी सकाळपासूनच कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होते. आज सकाळ...