Wednesday, April 29, 2026
Homeक्राईमCrime News : किरकोळ वादातून ट्रक चालकावर हल्ला

Crime News : किरकोळ वादातून ट्रक चालकावर हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील कपडिया ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकच्या दरवाज्यावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान थेट मारहाणीत होऊन एका ट्रक चालकावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चालक असलम अब्दुल सत्तार शेख (वय 54 रा. झेंडीगेट, अहिल्यानगर) हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

दरम्यान, त्यांनी उपचारावेळी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी (26 जुलै) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांनी दिलेल्या जबाबानुसार, शुक्रवारी (25 जुलै) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास श्रीराम पंप परिसरात ही घटना घडली. ट्रकच्या ड्रायव्हर साईड दरवाज्याला नुकसान झाल्याचे पाहून असलम शेख यांनी ट्रकचा वापर करणार्‍या अब्दुल बंगाली (रा. लाल टाकी) याला याबाबत विचारणा केली. याच गोष्टीवरून वाद निर्माण झाला.वाद शांत झाल्यावर अब्दुल बंगालीने आपला मुलगा सलमान शेख आणि त्याचा साथीदार शेहबाज शेख यांना घटनास्थळी बोलावून घेतले.

त्यानंतर तिघांनी मिळून असलम शेख यांना मारहाण केली. सलमान शेख याने हातात दगड घेऊन त्यांच्या नाकावर आणि तोंडावर मारला, यानंतर ट्रान्सपोर्ट मालकांनी हस्तक्षेप करून त्यांना वाचवले व उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी अब्दुल बंगाली, त्याचा मुलगा सलमान शेख आणि साथीदार शेहबाज शेख (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास महिला पोलीस अंमलदार कविता गडाख करीत आहेत.

ताज्या बातम्या

संतोष

Beed News: संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव का झाला? धनंजय देशमुख म्हणाले,...

0
बीड | Beedबीडमधील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनामुळे मस्साजोग येथे पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि...