Monday, July 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजतापाच्या गोळीने ट्रकचालकाला ग्लानी आली अन् होत्याचं नव्हतं झाल, अपघात कसा झाला?

तापाच्या गोळीने ट्रकचालकाला ग्लानी आली अन् होत्याचं नव्हतं झाल, अपघात कसा झाला?

जेजुरी | Jejuri
पुण्याच्या जेजुरीमध्ये (Jejuri) सोमवारी सकाळी दुर्दैवी घटनेत ट्रकच्या धडकेत तीन वारकरी महिलांचा ( warkari Ladies Death) मृत्यू झाल्याची घटना सासवड-जेजुरी टोलनाक्याजवळ (Saswad-jejuri Tollplaza) घडली. अपघातात चार वारकरी महिला गंभीर जखमी (Warkari Injured) झाल्या. त्यांच्यावर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी परिसरातील भोंगळे मळा परिसरात हा अपघात झाला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने सासवडहून जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. जेजुरीत पालखी सोहळा मुक्कामी आल्यानंतर ही दुर्देवी घटना घडली. ‘अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन वारकरी महिला मूळच्या सांगली जिल्ह्यातील कसबेडिग्रज गावच्या रहिवाशी आहेत. अपघातात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत,’ अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.

- Advertisement -

ग्लानी आली अन् ट्रक वारकऱ्यांच्या अंगावर गेला
अपघाती ट्रकचा चालक हा वारीसाठी शिधा घेवून जात होता. ट्रकचा ड्रायव्हर ७० वर्षे वयाचा होता. गेल्या काही दिवसांपासून तो ट्रक चालवत असल्याने ट्रक ड्राईव्हरला ताप आला होता. त्यानंतर त्याने तापाच्या गोळ्या घेतल्याने त्याला ग्लानी आली. त्यानंतर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला अन् ट्रक थेट पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगावर गेला. हा ट्रक नांदेडचा असल्याची माहिती समोर आली आहे.

जेजुरीजवळ भीषण अपघात! पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने चिरडलं, तिघांचा मृत्यू

मृतांची नावे आली समोर
मृतांमध्ये राजश्री शंकर भोसले (रा.मिरज), माधवी राजाराम सलगरे(वय 55 रा.मिरज), नंदा पवार (रा. मलकापूर) या तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून या तीनही महिला सांगली जिल्ह्यातील आहेत.

जखमी वारकऱ्यांना तातडीने रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. अपघात नेमका कसा झाला? ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यामुळे झाला की अन्य काही तांत्रिक बिघाडामुळे? याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस करत हे सगळे उपचार मोफत दिले जाणार असून मृत्यू झालेल्या वारकऱ्यांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

Monsoon Update : मान्सून पुन्हा जोर धरण्याची शक्यता; पॅसिफिक महासागरातील प्रणाली...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi भारतामध्ये सध्या हवामानाची (IMD) संमिश्र स्थिती पाहायला मिळत आहे. पूर्व भाग वगळता देशातील बहुतांश भागांत पावसाने ओढ दिली...