Monday, September 7, 2026
HomeनाशिकNashik News : जेवण बनवताना ट्रकमध्ये लागली आग

Nashik News : जेवण बनवताना ट्रकमध्ये लागली आग

सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

नाशिक |प्रतिनिधी| Nashik

- Advertisement -

तपोवन रोड परिसरात एका ट्रकला आग लागल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र जागरूक नागरिकांच्या प्रयत्नांमुळे व अग्निशामक दलाच्या तत्परतेने हे आग तात्काळ विझवण्यात  आल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही. 

तपोवन रोड येथे असलेल्या समीर मिठाई समोर एक ट्रक गेल्या दोन दिवसापासून उभा होता. याच ठिकाणी ट्रकमध्ये सध्या शहरात सुरू असलेल्या सिंहस्थाच्या  कामाचे सामान होते. दरम्यान मंगळवारी सायंकाळी ट्रक मधील क्लिनर  केबिनमध्ये स्वयंपाक बनवत असतानाच अचानक आग लागली. यावेळी ट्रक मधील  ड्रायव्हर व क्लिनरने तात्काळ बाहेर उडी मारली.

यावेळी समीर मिठाई मध्ये असलेल्या आग विझवायच्या साहित्याने ट्रकच्या केबिनला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी येथील नगरसेविका सीमा पवार व त्यांचे पती विशाल पवार यांनी तात्काळ अग्निशामक दलाला फोन करून घटनास्थळी बोलावले. यावेळी अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

शहरात अफवा

तपोवन परिसरात एका गॅसच्या ट्रकला आग लागल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली असल्याची अफवा शहरभर पसरली होती.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘बॉस’ने सांगितलं म्हणजे विषय संपला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील नेत्यामध्ये माझ्या नावावर सहमती होत नसेल आणि वाद होत असतील, तर मला जिल्हा बँकेच्या पदावर बसण्याची कोणतीही इच्छा नाही, असे स्पष्ट...