Tuesday, September 29, 2026
HomeनगरAccident News : घुलेवाडी परिसरात ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Accident News : घुलेवाडी परिसरात ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शहरातून जाणार्‍या जुन्या पुणे – नाशिक महामार्गावर घुलेवाडी परिसरात ट्रकच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 19) दुपारी घडली. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घुलेवाडी परिसरातील साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर नाशिकहून पुणेच्या दिशेने जाणार्‍या ट्रकच्या धडकेत महेंद्र दिनकर गायकवाड (वय 46) व भाऊसाहेब पांडुरंग निघुते (वय 53, दोघेही रा. घुलेवाडी) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच शहराचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक फराहनाज पटेल यांच्यासह पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत शहरातील खासगी रुग्णालयात दोघांना हलवले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मयत असल्याचे घोषित केले. त्यानंतर घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या घटनेचा शहर पोलीस अधिक तपास करत आहे.

ताज्या बातम्या

Ghoti Crime News : गोंदे MIDC गोळीबार प्रकरणाचा एलसीबीकडून छडा; एक...

0
घोटी | वार्ताहर | Ghoti वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (Wadhivhare Police Station Area) गोंदे एमआयडीसी परिसरात घडलेल्या खळबळजनक गोळीबार प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB)...