Sunday, June 14, 2026
Homeक्राईमCrime News : भररस्त्यात ट्रक अडवून 10 लाखांच्या गव्हाची लूट

Crime News : भररस्त्यात ट्रक अडवून 10 लाखांच्या गव्हाची लूट

परप्रांतीय ट्रक चालकाची पोलिसात फिर्याद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मध्यप्रदेशातून सोलापूरच्या दिशेने गहू घेऊन जाणार्‍या एका ट्रकला अहिल्यानगरजवळील देहरे टोल नाक्यावर अडवून चार चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत लूट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी ट्रक चालकाचे हातपाय बांधून ट्रकमधील नऊ लाख 67 हजार 200 रूपये किमतीचे गव्हाचे 953 कट्टे दुसर्‍या ट्रकमध्ये भरून लंपास केले आहेत.
याप्रकरणी जगदीश चतुर्भुज माळी (वय 55, रा. लहुजा, ता. सितामऊ, जि. मंदसौर, मध्यप्रदेश) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (28 जानेवारी) सायंकाळी फिर्याद दिली आहे. त्यावरून चार अनोळखीविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जगदीश माळी यांनी त्यांच्या ट्रकमध्ये निमज (मध्यप्रदेश) येथून गव्हाचे कट्टे भरले. ते सोलापूर येथे खाली करण्यासाठी निघाले होते. मंगळवारी (27 जानेवारी) रात्री 8:30 वाजेच्या सुमारास अहिल्यानगर- मनमाड रस्त्यावरील देहरे टोल नाक्याजवळ चार चोरट्यांनी त्यांचा 12 टायर ट्रक माळी यांच्या ट्रकसमोर आडवा लावला. त्यानंतर चोरट्यांनी माळी यांना चाकूचा धाक दाखवून धमकावले आणि त्यांचे हातपाय बांधून टाकले. चोरट्यांनी माळी यांच्या ट्रकमधील सात लाख 99 हजार 200 रूपये किमतीचे 833 गव्हाचे कट्टे आणि एक लाख 68 हजार रूपये किमतीचे 120 गव्हाचे कट्टे असा एकूण नऊ लाख 67 हजार 200 रूपयांचा गहू स्वतःच्या ट्रकमध्ये भरून पोबारा केला.

माळी यांनी या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता चोरटे पसार झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून गुन्हा नोंद केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोढे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. भररस्त्यात झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांनी घेतली रोहित पवारांची भेट; आंदोलन...

0
पंढरपूर । Pandharpur शेतकरी कर्जमाफीच्या अटींवरून राज्यातील राजकारण आणि शेतकरी चळवळींमध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा सरकारने केली असली, तरी...