बिबट्याही आढळला मृतावस्थेत
साक्री तालुक्यातील चिंचपाडापैकी वंजारकुडी येथे बिबट्याच्या हल्लयात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर बिबट्या देखील मृतावस्थेत आढळल्याने तर्कविर्तक लावले जात आहेत.
- Advertisement -
पिंट्या वेडू भारुडे (वय ३५) व दिलीप यशवंत मालुसरे (वय १७) अशी दोघा जखमींची नावे आहेत. त्यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
तर बिबट्याने दोन व्यक्तींवर हल्ला केल्यानंतर मयत अवस्थेत मिळून आल्याने तर्कवितर्क लावले
जात आहेत. बिबट्याला कोणी मारून टाकले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत वनक्षेत्रपाल ए.आर.माळके यांनी बिबट्याचे शवविच्छेदन बाकी असून त्यानंतर कारण स्पष्ट होईल, असे सांगितले.




