Thursday, April 30, 2026
Homeक्राईमCrime News : पूर्ववैमनस्यातून दोघा मित्रांना टोळक्याकडून मारहाण

Crime News : पूर्ववैमनस्यातून दोघा मित्रांना टोळक्याकडून मारहाण

दोन दुचाकींची तोडफोड || दिल्लीगेट परिसरातील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पूर्वीच्या किरकोळ वादाचा राग मनात धरून, दोघा मित्रांना चौघांनी मिळून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना दिल्लीगेट परिसरात घडली. इतक्यावरच न थांबता, या टोळक्याने दहशत माजवत घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकीची दगड, दांडके आणि कोयत्याने तोडफोड केली व जीवे मारण्याची धमकीही दिली.

- Advertisement -

याप्रकरणी अभिजित संतोष साठे (वय 19, रा. म्युन्सिपल कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी (11 नोव्हेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित साठे आणि त्याचा मित्र हे सोमवारी (10 नोव्हेंबर) रात्री साडेनऊ वाजता दुचाकीवरून दिल्लीगेट वेशीसमोरून जात होते. संशयित आरोपींनी त्यांना बोलावून घेतले. ते थांबताच, दुचाकी चावी काढून घेत शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी लोक जमा झाल्याने वाद मिटला.

मात्र, या घटनेनंतर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हेच चौघे संशयित आरोपी अभिजितच्या म्युन्सिपल कॉलनीतील घराजवळ आले. त्यांनी प्रथम अभिजितच्या मित्राच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकीची दगड, लाकडी दांडके आणि कोयत्याने तोडफोड करून मोठे नुकसान केले. त्यांनी मित्राच्या कुटुंबीयांना तुमच्या पोराला समजावून सांगा, नाहीतर आम्ही त्याला जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर टोळके अभिजितच्या घराकडे आले. अभिजितच्या घराला कुलूप असल्याने, त्यांनी घराच्या दरवाजावर दगडे मारली आणि अभिजितला नावाने शिवीगाळ करत त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

ताज्या बातम्या

दिंडोरी नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

0
दिंडोरी । प्रतिनिधी Dindori दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी भाजप नगरसेविका आशा कराटे यांचा आज एकमेव एक अर्ज दाखल झाल्याने आशा कराटे यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला...