Tuesday, April 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजभावाचा खून करणार्‍यासह एकाला आजन्म कारावास

भावाचा खून करणार्‍यासह एकाला आजन्म कारावास

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

जमीन विकल्याच्या रागातून सख्ख्या भावावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडत त्याचा खून करणार्‍या लहान भावासह एकाला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार जोशी यानी आज (दि.९) आजन्म कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

- Advertisement -

६ ऑक्टोबर २०२० रोजी ११.३० च्या दरम्यान घरातून लघूशंकेसाठी निघालेल्या देवीदास नामदेव कुटे यांचा पिस्तूलातून गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना तालुक्यातील वडझिरे येथे घडली होती. तशी तक्रार मयत कुटे यांच्या पत्नी सरिता कुटे (२९) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती.

मयत कुटे यांचे लहान भाऊ गणेश नामदेव कुटे (२८) रा. श्रीमुख अपार्टमेंट, उद्योगभवन, साईबाबा मंदिराशेजारी व प्रविण शंकर वाक्चौरे (२८) रा. पांडवनगरी, शिवाजीनगर, सिन्नर यांनी देवीदास कुटे यांना घराच्या बाहेर बोलावले होते. सोमनाथ गिते यांच्या पोल्ट्रीची पिल्ले आले असून त्याचा फोन नंबर विचारण्याचा बहाणा करुन त्यांनी लघुशंकेला जाणार्‍या देवीदास कुटे यांच्यावर पिस्तूलातून तीन गोळ्या झाडून त्यांचा खून केला होता.

तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या खटल्याचे काम न्यायालयात चालले होते. सरकारी वकील सुलभा सांगळे यांनी सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयात काम पाहिले. त्यांना हवालदार संतोष केदार, माया पगारे यांनी सहकार्य केले. दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास दोघांनाही भागावा लागणार आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १४ एप्रिल २०२६ – भोळी आशा अखेर विफल

0
पाकिस्तान नामक अचानक उदयास आलेल्या नव्या शांततेच्या मसीहाच्या मध्यस्थीनिशी अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबादेतील शांतता चर्चेबद्दल फारशी अपेक्षा कोणालाही नव्हतीच; तरीही आखातात दीड महिन्यापेक्षा...