Wednesday, January 15, 2025
Homeनगरदोन पोलिसांमधील बाचाबाचीचे रुपांतर धुमश्चक्रीत

दोन पोलिसांमधील बाचाबाचीचे रुपांतर धुमश्चक्रीत

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाच्या आत्महत्येचे पत्र चर्चेत असतानाच काही दिवसांपूर्वी दोन पोलीस कर्मचार्‍यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. या शाब्दिक बाचाबाचीचे रुपांतर धुमश्चक्रीमध्ये झाल्याने पोलिसांमधील वादाची खमंग चर्चा होत आहे.

- Advertisement -

एक पोलीस अंमलदार डिग्रस येथे आरोपी घेण्यासाठी जात होते. त्यांना गाडी सोबत एक पोलीस कर्मचारी हवा होता. त्यांनी गाडीवर कर्तव्य बजावणार्‍या अंमलदाराला आरोपी घेण्यासाठी चला असे सांगितले. त्यावर, तुम्ही साहेबांना विचारा तरच येईल असे या कर्मचार्‍याने सांगितले. यानंतर तो अंमलदार पोलीस निरीक्षकांकडे गेला आणि घडलेली हकीगत सांगितली. त्यानंतर पोलीस निरीक्षक हे त्या अंमलदारावर भडकले. त्यानंतर तो अंमलदार दुसर्‍या अंमलदाराकडे गेला आणि पोलीस निरीक्षकांना तू माझ्याबद्दल काय कान भरले खरे सांग असे बोलला.

यामुळे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. त्यातून दोघांमध्ये धरपकड झाली आणि त्याचे रुपांतर शिवीगाळमध्ये झाले. त्यावेळी उपस्थित पोलीस कर्मचार्‍यांच्या हा वाद लक्षात आल्यानंतर त्यांनी मध्यस्थी केली. यामुळे या प्रकरणावर पडदा पडला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या