Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

दुर्दैवी : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

भरधाव रिक्षेच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अंबड लिंक राेडवरील आझानगरमधील हिंदुस्थान बेकरीमागे शुक्रवारी (दि.४) सायंकाळी घडली. अदनान फिराेज शेख असे मृत बालकाचे नाव आहे.

रिक्षेची धडक बसताच अदनान सुन्न झाला. तेव्हा चालकाने काहीही न झाल्याचा आव आणून अदनानला त्याच्या आईकडे साेपविले. मात्र, अत्यवस्थ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले असता, डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पसार चालकाचा शाेध सुरु झाला आहे.

ताज्या बातम्या