Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजOperation Tiger : राजकारणात पुन्हा भूकंप होणार? ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदेंच्या...

Operation Tiger : राजकारणात पुन्हा भूकंप होणार? ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदेंच्या संपर्कात, मंत्री उदय सामंतांचा दावा

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप (Maharashtra Politics) होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे सहा खासदार उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेला जाऊन मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. हे पक्षप्रवेश अगदी लवकरच होणार आहेत अशीहि माहिती आहे.

- Advertisement -

शिवसेनेनं ऑपरेशन टायगरची (Shivsena Opration Tiger) तयारी जवळपास पूर्ण झाल्याचं बोललं जात आहे. अशात राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना आमदार उदय सामंत यांनीही शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भविष्यात उदय सामंतांच्या दाव्यानुसार आमदार खासदार ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्याचे उद्याग मंत्री उदय सामंत यांनी नागपूर विमानतळावर माध्यमंशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरे गटातील सहा खासदार संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानुसार, एखाद मिशन राबवायचं असेल तर, ते सांगून राबवलं जात नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामामुळे कोणतंही मिशन चालवायची गरज नाही. कारण काही लोकांना कळालेलं आहे की, बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेनाही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली चालते. त्यामुळे अनेक लोकं संपर्कात असून, त्यांचा टप्प्याटप्प्याने प्रवेशही होणार हे निश्चित आहे, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

मागच्या वेळी सांगितलं होतं येत्या ९० दिवसांत उद्धव ठाकरे गटातील काही माजी आमदार आणि महाविकास आघाडीतील काही माजी आमदार हे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वासोबत येणार आहेत. माझ्या या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे. कारण लोकांना आता समजू लागलं आहे की, एकनाथ शिंदेंचं नेतृत्व हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापेक्षा चांगलं आहे. त्यामुळे अनेक लोकं संपर्कात आहेत, असेही उदय सामंत म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...