Saturday, April 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल, कारण काय?

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल, कारण काय?

मुंबई । Mumbai

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे हे सकाळी ८ वाजल्यापासून गिरगाव येथील एच.एन रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.

- Advertisement -

उद्धव ठाकरे हे आरोग्य तपासणीसाठी एच.एन रिलायन्स रुग्णालयात गेले, ठाकरेंच्या हृदयाच्या धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी चाचण्या केल्या. या रिपोर्टमध्ये ब्लॉकेज आढळल्याने उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता उद्धव ठाकरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. याआधी २०१२ साली ठाकरेंवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

राज्यात २०२२ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला धूळ चारल्यानंतर महाविकास आघाडीचा उत्साह दुणावला आहे. राज्यात महाविकास आघाडीची धुरा प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...