Wednesday, July 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray: गद्दार शिरोमणी जो बसलाय तिकडे; उध्दव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर सडकून...

Uddhav Thackeray: गद्दार शिरोमणी जो बसलाय तिकडे; उध्दव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर सडकून टीका, म्हणाले गद्दारच गद्दारी…

यवतमाळ | Yavatmal
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ६ खासदांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत २२ जून रोजी प्रवेश केला. ज्यानंतर ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. परंतु, या ऑपरेशन टायगरला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आज शनिवारपासून (27 जून) उद्धव ठाकरे हे आपल्या पक्षातील नेत्यांसोबत पुढील तीन दिवस फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी असा ठाकरेंचा दौरा असणार आहे.

या दौऱ्यातील उद्धव ठाकरे यांची यवतमाळमध्ये पहिली भव्य सभा होत आहे. या सभेदरम्यान त्यांनी जमलेल्या तमाम जनतेची माफी मागितली आहे. यावेळी त्यांनी माझी चूक झाली म्हणून उपस्थित कार्यकर्ते आणि जनतेची माफी मागितली. या सभेतून फुटलेल्या खासदारांवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली.

- Advertisement -

”काहीवेळेला माझी चूक होते. माझ्या सांगण्यावरुन जे तुम्हाला मी एक बुझगावणं दिलं होतं त्याला अक्षरश; रक्ताचं पाणी करून समोर पाऊस पडत असतानाही तरी देखील कशाचीही तमा न बाळगता निवडणून दिलं. त्याबद्दल मी क्षमा मागतो. मी मतदारसंघातील जनतेची माफी मागतो. शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझा शब्द आणि या भरवशावर या गद्दाराला निवडणूक दिलं होतं. त्यांनी गद्दारी करून आपल्या विश्वासाला काळं फासरलं. शेवटी गद्दारच गद्दारी करून गद्दारांच्या कळपात गेला. तीन चार वर्षांपूर्वी गद्दार शिरोमणी जो बसलाय तिकडे मिंदे, त्याने ४० आमदार फोडले. या विदर्भात जेव्हा बैलपोळा होता तेव्हा या बैलांवर लिहिलं होतं ५० खोके एकदम ओके असं लिहिलेलं होतं.”

MAHA TET Paper Leak:पेपर फुटीच्या प्रकरणाने राज्य पुन्हा हादरले; TET पेपर कसा फुटला? भिवंडीत धाड टाकताच पोलिसही चक्रावले

क्षमा मागण्यासाठी महाराष्ट्रत फिरणार
उद्धव ठाकरे म्हणाले, आजपासून मी या सर्व गद्दारांच्या मतदारसंघातील माझ्या कट्टर शिवसैनिकांना भेटण्यासाठी आणि त्याचबरोबरीने इथल्या ज्या मतदारांनी केवळ आणि केवळ शिवसेनेवर, शिवसेनाप्रमुखांचा चेहरा बघून आणि मशाल बघून आम्ही जो उमेदवार दिला, त्याला त्याचे काही पार्श्वभूमी किंवा इथे काही न बघता निवडून दिले, त्या सर्व मतदारांची आणि शिवसैनिकांची मी माफी मागेन किंवा क्षमा मागण्यासाठी महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे.

आमदारांना ५० कोटी दिले तर खासदारांना किती दिले असतील?
मागील बंडखोरीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, तेव्हा सर्वत्र गावात, खेड्यापाड्यात सभा गाजली होती. अगदी मला आठवतेय विदर्भामध्ये बैलपोळ्याच्या दिवशी बैलांवरती सुद्धा ते लिहिले गेले होते. आता आमदारांना जर तेव्हा ५० कोटी दिले गेले असे म्हणत असतील, तर खासदारांना किती दिले गेले असतील? हा धंदा झाला.

ते म्हणाले की, काही शेतकऱ्यांनी मला एक निवेदन दिलं. पीक विम्याचा पत्ता नाही, हमीभाव मिळतोय की नाही माहित नाही म्हणत होते. म्हणजेच शेतकऱ्याला त्याच्या मालाला हमीभाव नाही, पण आमच्या भरोशावर जे निवडून आलेले खासदार आहेत, त्यांना मात्र भरघोस हमीभाव मिळालाय. त्यामुळे या सगळ्या उपटसुंभांनी आमच्यावर टीका करण्याचं धाडस करू नये, असा टोला त्यांनी लगावला.

आईची शपथ घेऊन हे गद्दारी करणार असतील तर खरोखर आईला काय वाटेल
यावेळी उद्धव ठाकरेंनी बंडखोर खासदार संजय देशमुख यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. यामध्ये ते त्यांच्या आईचा उल्लेख करत ठाकरेंची साथ सोडणार नाही, असे बोलताना ऐकू येत आहे. ही क्लिप ऐकवल्यानंतर ठाकरेंनी संजय देशमुखांना उद्देशून म्हटले की, आईला काय वाटेल? आईची शपथ घेऊन हे गद्दारी करणार असतील तर खरोखर आईला काय वाटेल. चूक आपल्या सर्वांची झाली. याने पूर्वी एकदा गद्दारी केली होती. तरी परत आले. टेपमध्ये ऐकले असेल, पण मी त्यांना एकच सांगेल शिवसेनेवर संकट येऊच शकत नाही. तुझी काळजी कर. माझी करू नको.

शिवसेना चोरली, चिन्ह चोरलं तरी ठाकरे उभा आहे. तुम्ही शिवसेना चोरल्यावर हक्काचे नऊ खासदार निवडून आणले. ती फोडण्याची वेळ का आली? तेव्हा म्हणत होते १८ खासदार मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले. आम्ही महाविकास आघाडीचे ३१ खासदार छाताडावर बसवले होते. कुठे गेली मोदींची लाट. दोन वर्षात हे लोकसभेत किती वेळा हजर होते. आंदोलने काय केली. जी आंदोलने आपण केली, मी काही उपकार नाही केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. कोणी मागितील नव्हती आपण मुक्ती दिली. सर्व म्हणतात मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मग निष्ठेला जाग ना.

इकडे वाघाचे जीवन जगत होता तिकडे गाढवाचे जीवन जगा
गद्दार जिथे जिथे सापडेल तिथे त्याला तुम्ही जाब विचारायला पाहिजे. इकडे वाघाचे जीवन जगत होता तिकडे गाढवाचे जीवन जगा. प्रेम देणारी संघटना केवळ शिवसेना आहे. हिंदुत्व राम मंदिर लुटणार नाही. आम्हाला आता भाजपा मुक्तराम पाहिजे आहे. त्यासाठी शिवसेना लवकरच सुरुवात करणार आहे.नीटचे पेपर फुटतात. प्रश्न विचारते म्हणून शिवसेना संपवायला हे निघाले आहेत.”

ताज्या बातम्या

संपादकीय : २९ जुलै २०२६ – ग्राहक हक्कांची डिजिटल चळवळ

0
वाढती महागाई, तांत्रिक आव्हाने आणि शासकीय पातळीवरील धोरणात्मक निर्णय जेव्हा थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागतात, तेव्हा असंतोष व्यक्त करण्याचे...